महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य न्युजरूम

पेंढारकर महाविद्यालयात ‘आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता’ विषयावर भव्य परिसंवाद

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. वि. पेंढारकर महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांच्या मालिकेतील प्रमुख कार्यक्रम म्हणून येत्या २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालय व्यवस्थापनाच्या डॉ. सुचित्रा कामत यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार असून शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ तसेच ज्येष्ठ समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
महात्मा फुले यांच्या शिक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि कृषीविषयक विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावर या परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे. डॉ. दीपक गायकवाड, श्री. हेरंब कुलकर्णी, डॉ. लक्ष्मी साळवे आणि डॉ. प्रवीण बोरकर हे तज्ज्ञ वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. उच्च शिक्षण विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, महाविद्यालयात ३ ऑगस्ट २०२६ रोजी महात्मा फुले यांच्या कार्यावर आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, उत्तेजनार्थ बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार असून परिसंवादाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ऐतिहासिक संस्थेला यंदा १५३ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांनी मांडलेले समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि स्त्री सक्षमीकरणाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांच्या कार्याचे समकालीन संदर्भात चिंतन घडवून आणणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »