महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

आमच्या नादी लागू नका; वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक मिळेल,मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला यांना थेट इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी – भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मनसे यांच्यातील राजकीय वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत नंदू परब यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत परब यांच्यावर निशाणा साधला.
भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या नावाचा उल्लेख करत राजू पाटील यांनी, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्यांची औकात आहे का?असा सवाल केला. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टीका केली. दुसऱ्या पक्षात हे चालत असेल, पण आमच्या पक्षाला याची लागण लागू नये,असा टोला राजू पाटील यांनी लगावला.

 डोंबिवलीतील नेहरू मैदान आणि सावरकर उद्यानातील कार्यालयाच्या मुद्द्यावरूनही राजू पाटील यांनी भाजपला सवाल केले. नेहरू मैदान कोणाला देण्यात आलं? ते अधिकृत आहे का? सावरकर उद्यानात असलेलं कार्यालय अधिकृत आहे का?असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणांची माहिती समोर आणण्याचा इशारा त्यांनी दिला.
दिव्यातील अनधिकृत रिक्षांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. आमच्या नादी लागू नका; नाहीतर सगळं बाहेर काढू, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला.
हर्षद पाटील यांच्याबाबत बोलताना हर्षद पाटील हा फक्त पदाधिकारी नाही, माझा भाऊ आहे,असे सांगत राजू पाटील यांनी त्यांच्यामागे मनसे ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.
पक्षाच्या प्रश्नाला पक्षाच्या पद्धतीने उत्तर द्या. व्यक्तिगत टीका करू नका. वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक येईल,असा इशारा देत राजू पाटील यांनी नंदू परब यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील भाजप-मनसेमधील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »