महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य न्युजरूम

कल्याणात ७० बासरीवादकांची गुरूंना स्वरवंदना,‘परंपरा’मध्ये पंडित विवेक सोनार आणि उस्ताद फजल कुरेशी यांची विशेष मैफिल

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध गुरुकुल परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कल्याणातील ‘गुरुकुल प्रतिष्ठान’तर्फे ‘परंपरा’ या बासरीवादन विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बासरीवादक प्रशांत बनिया यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात त्यांच्या ७० हून अधिक शिष्यांकडून आपल्या गुरूंना अनोखी स्वरवंदना अर्पण केली जाणार आहे.

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कल्याणमधील के. सी. गांधी हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे. तीन पिढ्यांच्या गुरु-शिष्य परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात ७० हून अधिक बासरीवादक विविध राग, रागाधारित रचना तसेच सिनेसंगीताची सुरेल गुंफण सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रशांत बनिया यांचे गुरू आणि विख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांची विशेष प्रस्तुती. त्यांच्या बासरीवादनाला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद फजल कुरेशी तबल्याची साथ करणार आहेत. यासोबतच प्रशांत बनिया यांचे एकल बासरीवादनही रसिकांना अनुभवता येणार आहे.

गुरु-शिष्य परंपरेतील नात्याचे विविध पैलू आणि भारतीय शास्त्रीय संगीताची साधना यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांसमोर येणार आहे. केवळ परंपरा जपणे नव्हे, तर ती नव्या पिढीच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.या सांगीतिक सोहळ्याला प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीन पिढ्यांच्या बासरीवादकांची ही अनोखी स्वरवंदना अनुभवावी, असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »