DESK MARATHI NEWS NETWORK
दिल्ली/प्रतिनिधी -हिंदी दिनानिमित्त दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय भाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्दू भाषेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘हा मनाचा’ पुरस्कार देण्यात आला.
देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ जणांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. विशेषतः, राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून केवळ ३ जणांची निवड झाली असून, त्यात एजाज अहमद शेख यांचा समावेश आहे.
कल्याण येथे राहणारे एजाज शेख हे मुंबईतील साकी नाका येथील ग्लोबल ज्युनियर कॉलेजमध्ये उर्दू आणि भूगोल विषयाचे शिक्षक आहेत. गेल्या गेल्या १५ वर्षांपासून या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करण्यासोबतच तो इन्किलाब उर्दू वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम करत आहे.



