महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स

एसी कोचमधून महिलेची बॅग चोरी; एटीएममधून 80 हजार रुपये लंपास,गुजरातमधील दोघांना अटक; दोन्ही आरोपींचे नाव ‘मुकेश पुरोहित’

DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -इंदोर-पुणे एक्सप्रेसच्या एसी कोचमधून महिला प्रवाशाची लॅपटॉप, आयफोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य असलेली बॅग चोरी करून, तिच्या एटीएम कार्डचा वापर करत तब्बल 80 हजार रुपये काढल्याप्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी गुजरातमधील दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींचे नाव मुकेश पुरोहित असून, त्यांची नावे मुकेश कांतीलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित अशी आहेत. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.

इंदोर-पुणे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी महिला वसई आणि भिवंडीदरम्यान झोपेतून उठल्यानंतर तिची बॅग गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले. बॅगेमध्ये आयफोन, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य होते. याप्रकरणी महिलेने डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीला गेलेल्या एटीएम कार्डचा वापर झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कार्डच्या माध्यमातून तब्बल 80 हजाररुपये काढण्यात आल्याचे समोर आले. पैसे ज्या एटीएममधून काढण्यात आले, त्याची माहिती मिळवत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
तपासाच्या आधारे पोलिसांनी मुकेश कांतीलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी महिलेची बॅग एसी कोचमधून चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही आरोपी गुजरातमधील एका मोबाईल दुकानात काम करत असून, मोबाईलशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईला आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान त्यांनी इंदोर-पुणे एक्सप्रेसमधून महिलेची बॅग चोरी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चोरीच्या एटीएम कार्डचा वापर करून 80 हजार रुपये काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
डोंबिवली जीआरपी पोलिसांनी दोन्ही आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचा संशय असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली जीआरपी पोलीस करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »