DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत सदस्य तयार करण्यात कल्याणच्या आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. कल्याण आरटीओचे अधिकारी आशुतोष बारकूल यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.
१ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच १ जून २०२६ पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना दहा हजार रुपये सन्मान निधीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
सन्मान निधीचा धनादेश वितरण कार्यक्रम गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. कल्याण आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण ५ हजार ८०० वाहन धारक यांनी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व स्वीकारले आहे. कल्याण आरटीओ कार्यालयाचा जास्तीत जास्त सभासद करुन राज्यात दुसऱ्या नंबरवर येण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कल्याण आरटीओचे अधिकारी बारकुल यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.
५ हजार ८०० सभासदांपैकी २५१ सभासद ज्यांची वयाची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा वाहनधारकांना सन्मान निधी योजनेमार्फत दहा हजार रुपये सन्मान निधीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.



