DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव पारसनाथ तिवारी यांच्या हल्लाबोल के केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मराठी भाषेचा मुद्दा पुढे करून केवळ राजकीय स्टंट करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंदी भाषी सेलचे राजे प्रमुख व महासचिव पारसनाथ तिवारी यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावर टोला लगावत पारसनाथ तिवारी म्हणाले की, “परिवहन मंत्र्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा आपल्या परिवहन खात्याच्या कारभाराकडे लक्ष द्यावे. राज्य परिवहन महामंडळाच्या खस्ताहाल बसेस, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



