महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य ताज्या घडामोडी

गुरु शिष्यांच्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर मंत्रमुग्ध,गुरु-शिष्य नात्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारी सुरेल ‘परंपरा’

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – गुरु-शिष्य परंपरेतून भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि रसिकांना भारतीय संगीताच्या विविध प्रवाहांचा अनुभव देणे, या उद्देशाने गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ‘परंपरा’ या सांगीतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या आठव्या पर्वात बासरीच्या सुमधुर स्वरांनी कल्याणकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांपासून संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांपर्यंतच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणांनी मैफलीला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘ॐ जय जगदीश हरे’ या लोकप्रिय भजनाच्या सादरीकरणाने केली. त्यानंतर ‘जयोस्तुते’चे बासरीवर सुरेल सादरीकरण झाले. भारतीय भावसंगीतातील वैविध्य अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मधुमास हा नवा’ यांसारख्या लोकप्रिय मराठी चित्रपटगीतांसह देवीच्या गोंधळातील विविध गीतांचेही बासरीवादन केले. शास्त्रीय, भावगीत आणि लोकसंगीताचे विविध पैलू बासरीच्या सुरावटीतून उलगडत गेले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमातील नवोदित कलाकारांच्या सादरीकरणांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर गुरू आणि गुरुकुलचे कल्याण शाखा प्रमुख बासरीवादक प्रशांत बानिया यांनी शास्त्रीय रागांवर आधारित एकल बासरीवादन सादर केले. आलाप, स्वरांची मांडणी आणि रागदारी संगीताची वैशिष्ट्ये बासरीच्या मधुर स्वरांतून उलगडत त्यांनी रसिकांना शास्त्रीय संगीताची अनुभूती दिली. त्यांना तबलावादक स्वप्निल भाटे यांनी समर्थ साथ दिली.

गुरुकुल प्रतिष्ठानचेसर्वेसर्वा बासरीवादन पंडित विवेक सोनार आणि सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद फजल कुरेशी यांची बासरी-तबला जुगलबंदी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. दोन्ही कलाकारांनी आपल्या वादनातील तांत्रिक सफाई, लयकारी आणि परस्पर सांगीतिक संवादातून जुगलबंदीचे अप्रतिम दर्शन घडवले. बासरीच्या सुरेल स्वरांना तबल्याच्या दमदार लयीची साथ लाभल्याने सभागृहातील वातावरण संगीतमय झाले.

नवोदित कलाकारांना संधी देतानाच अनुभवी कलाकारांच्या सादरीकरणातून संगीताची परंपरा आणि विविधता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘परंपरा’ उपक्रमाचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवला. गुरु-शिष्य परंपरेतील सातत्य जपत नव्या पिढीला भारतीय संगीताशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. निवेदिका प्राजक्ता आपटे यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध निवेदन केले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुकुल प्रतिष्ठानला शुभेच्छा देत, कल्याण शाखाप्रमुख बासरीवादक प्रशांत बानिया यांचे विशेष कौतुक केले. भारतीय सांगीतिक संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरू पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »