महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

कल्याण-डोंबिवली महापालिका महासभा तहकूब; काँग्रेसची भाजपवर टीका

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी-पुण्यात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद केडीएमसीत
कल्याण : पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत नियोजित महासभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजपच्या आग्रहानंतर केडीएमसीची महासभा तहकूब करण्यात आली.

महासभेदरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी पुण्यातील घटनेचा निषेध करत मनसेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित करत सभा घेऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतल्याने सभागृहातील वातावरण तापले. अखेर भाजपच्या मागणीनंतर महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महासभा तहकूब केल्याच्या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महासभा ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असते; मात्र येथे सत्तेचा खेळ सुरू आहे. भाजपने ही नाटकं बंद करावीत. विरोध असेल तर सत्तेतून बाहेर पडावे. सत्तेच्या या खेळामुळे जनतेचे प्रश्न मात्र लांबले आहेत,” असा पलटवार काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »