महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पर्यावरण

नांदिवली तलावाचे महिनाभरानंतर ‘डीप क्लीनिंग’; वारकरी समाज, केडीएमसी आणि सुमित एल्कोप्लास्टच्या संयुक्त प्रयत्नांना यश

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाच्या स्वच्छतेसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विशेष ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेला अखेर यश आले आहे. कल्याण शहर वारकरी समाज, स्वच्छ भारत अभियान टीम, केडीएमसीचे सफाई कर्मचारी आणि सुमित एल्कोप्लास्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून तलावाची आतून तसेच बाहेरून व्यापक स्वच्छता करण्यात आली.
गेल्या महिनाभरात तलावातील पाण्यात तसेच परिसरात साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा बाहेर काढण्यात आला. यामध्ये नारळ, निर्माल्य, पूजेचे साहित्य तसेच नागरिकांकडून टाकण्यात आलेला विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. हा कचरा हटवून तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत कल्याण शहर वारकरी समाजाचे मृत्युंजय शुक्ला यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. महिनाभर सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेला त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठी चालना मिळाली.
तलावातून बाहेर काढलेला कचरा पुन्हा परिसरात साचू नये, यासाठी सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांमधून कचऱ्याची वाहतूक करून तो योग्य ठिकाणी नेण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे कचरा हटवण्यासोबतच त्याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेलाही मदत झाली.
महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर नांदिवली तलावाचा परिसर आता अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत दिसत आहे. मात्र, ही स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनी तलावात निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नांदिवली तलावाची ही स्वच्छता मोहीम प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, नागरिक आणि उद्योगसमूह यांच्या संयुक्त सहभागातून सार्वजनिक स्वच्छता कशी प्रभावीपणे साधता येते, याचा आदर्श ठरली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »