महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेविरोधात भव्य जनआक्रोश महामोर्चा

DESK MARATHI NEWS NETWORK.
उल्हासनगर/प्रतिनिधी -उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील ३१ घरे आणि एका मशिदीला दिलेल्या नोटिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधित नोटिसा तातडीने रद्द करून कारवाई थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. महामोर्चादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी उल्हासनगर शहराच्या उभारणीत वंचित आणि कष्टकरी समाजाच्या योगदानाचा उल्लेख करत महानगरपालिका प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले की, उल्हासनगर शहर उभे करण्यासाठी वंचितांची मेहनत आवश्यक होती. शहरात उद्योग, कारखाने, कपड्यांचा बाजार आणि पैसा आल्यानंतर मात्र व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन मेहनत करणाऱ्या वंचितांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच उल्हासनगरमधील मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, पारशी समाजाचे फायर टेंपल, बुद्ध विहार तसेच इतर जुनी धार्मिक स्थळे यांना विशेष विंडोच्या माध्यमातून नियमित करून अधिकृत दर्जा देण्यात यावा. कोणत्याही धार्मिक स्थळावर तोडक कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, महानगरपालिकेने ३१ घरे आणि मशिदीला दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घेऊन कारवाई थांबवावी, अशी ठाम भूमिका सुजात आंबेडकर यांनी मांडली. तसेच उल्हासनगरमधील सर्व घरे नियमित करण्यात यावीत. संबंधित नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रत्येक घराची मालकी संबंधित नागरिकांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सरकारने तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या महामोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »