महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

यंदाचा ‘डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव’ रद्द; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी वळवणार

  1. DESK MARATHI NEWS NETWORK

डोंबिवली/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील प्रसिद्ध ‘रासरंग दांडिया उत्सव’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या आयोजनासाठी करण्यात येणारा निधी यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाला डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातून हजारो नागरिक उपस्थित राहत असतात.
मात्र, यंदा राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात असताना मोठ्या स्वरूपात दांडिया उत्सव साजरा करण्याऐवजी त्याच्या आयोजनासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात ही मदत करायची, याबाबतचे नियोजन सुरू असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. अकोला, बुलढाणा यांसह विविध भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबांना मदत करताना त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही मदतीचा हात देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा रासरंगचा भव्य दांडिया उत्सव रद्द करण्यात आला असला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना करण्यात येणार आहे.
उत्सव दरवर्षी साजरे करता येतात; मात्र संकटाच्या काळात अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे, या भूमिकेतून रासरंगचा जल्लोष बाजूला ठेवून शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »