महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
शिक्षण

कल्याण डोंबिवलीतील ४०० हून अधिक शिक्षक बनले घनकचरा व्यवस्थापनाचे इम्पॅक्ट अँबॅसॅडर

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे उत्साहात पार पडला

या उपक्रमाचे मुख्य काम कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे असून, असिमेट्रिकल लर्निंग आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांनी ही कार्यशाळा आयोजित केली.

महानगरपालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांमधील ४०० हून अधिक शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचऱ्याची विल्हेवाट नव्हे, तर शिक्षकांनी ‘इम्पॅक्ट अँबॅसॅडर’ म्हणून समाजात बदल घडवण्यासाठी काय करायला हवे, यावर कार्यशाळेचा भर होता.

प्रशिक्षक जितेंद्र साळी आणि रोहित कांबळे यांनी हे प्रशिक्षण अतिशय प्रभावीपणे घेतले. आदिती देवधर यांनी तयार केलेल्या वर्कबुकच्या आधारे “कचरा नेमका निर्माण कुठून होतो?” आणि “निसर्गात कचरा का नसतो?” अशा सोप्या प्रश्नांमधून सखोल वैचारिक मंथन झाले. विविध खेळ आणि उपक्रमांमध्ये शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

रिफ्यूज, रिड्यूस, रिथिंक ते रिसायकल अशा 7R संकल्पनेवर विशेष चर्चा झाली. जगभरातील केस स्टडीज, उदाहरणे आणि दृश्य सादरीकरणांच्या माध्यमातून कचऱ्याच्या समस्येची व्याप्ती मांडण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, एवढेच नव्हे तर ते तसे का केले जाते आणि त्यामागील प्रत्यक्ष आकडेवारी काय सांगते, हेही शिक्षकांनी समजून घेतले.

प्रशिक्षित शिक्षक आता आपल्या शाळांमध्ये देण्यात आलेले सेग्रिगेशन कॉर्नर, वर्कबुक आणि फ्लॅशकार्ड्स यांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करतील आणि कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त, स्वच्छ भविष्याकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता असिमेट्रिकल लर्निंगच्या सहसंस्थापिका केतकी सोहोनी यांनी केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »