महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क पोलिस टाइम्स

कल्याण स्टेशन परिसरातून दिवसा मुंबई पोलिस कर्मचाऱ्याची बुलेट चोरीला सीसीटीव्हीत घटना कैद

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी _मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची ३५० क्लासिक बुलेट कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील तहसीलदार कार्यालयाबाहेरील फुटपाथवरून चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, बुलेट चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, चोरीला गेलेल्या बुलेटचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.
आशिष बळीराम निघोट हे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत. २३ जुलै २०२६ रोजी त्यांनी त्यांची ३५० क्लासिक बुलेट कल्याण स्टेशन परिसरात, कोर्टासमोरील रस्त्यालगत तहसीलदार कार्यालयाबाहेरील फुटपाथवर उभी केली होती. काही वेळाने ते परत आले असता त्यांची बुलेट जागेवर नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर निघोट यांनी कल्याण येथील एमएफसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी २३ जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुलेट चोरीचा प्रकार कैद झाला असून, त्याआधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचीच बुलेट दिवसाढवळ्या गर्दीच्या कल्याण स्टेशन परिसरातून चोरीला गेल्याने परिसरातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरीला गेलेल्या बुलेटचा अद्याप तपास लागला नसल्याने पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »