महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवलीतील नेहरू मैदानावरील अतिक्रमण तातडीने हटवा; मनसेची आयुक्तांकडे मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नेहरू मैदानावर करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
नेहरू मैदान हे डोंबिवलीतील नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण आहे. त्यामुळे मैदानाच्या जागेचा अनधिकृत वापर होत असल्यास महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून संबंधित अतिक्रमणाची चौकशी करावी आणि नियमबाह्य बांधकाम अथवा अतिक्रमण आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक मैदान हे नागरिकांच्या हक्काचे असून, कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला त्यावर अतिक्रमण करून सार्वजनिक जागेचा गैरवापर करण्याचा अधिकार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे आणि नेहरू मैदान नागरिकांसाठी पूर्ववत खुले करावे, अशी ठाम भूमिका हर्षद पाटील यांनी व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »