महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर न्युजडेस्क

कोपरगाव ते मोठागाव रस्त्यावर पथदिव्यांचा उजेड,नागरिक व वाहनचालकांना मोठा दिलासा

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव ते मोठागाव या महत्त्वाच्या मार्गावर पथदिवे बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच अपघातांचा धोका देखील वाढला होता.

या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांनी पाठपुरावा करून रस्त्यावर नवीन पथदिव्यांची व्यवस्था उभारली. या विकासकामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे नंदू परब स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पथदिव्यांमुळे संपूर्ण मार्ग उजळून निघाला असून रात्रीच्या वेळी प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. विशेषतः कामानिमित्त उशिरापर्यंत बाहेर असणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

यावेळी बोलताना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. तर नगरसेवक जयेश म्हात्रे यांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे विकासकामांना गती मिळत असल्याचे नमूद केले.
पथदिव्यांच्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच पायाभूत सुविधा आणि विकासकामे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »