DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -2009 मधील वसंत डावखरे सीडी प्रकरणाशी संबंधित मानहानीच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश संतोष आगे यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मानहानीच्या खटल्यात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे तसेच सभेचे आयोजक रमाकांत देवलेकर हे आरोपी आहेत. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर आता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
खटल्याचा निकाल ९ सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर कल्याण न्यायालय परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.



