DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण /प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळावा यासाठी महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्याची मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित कोळेकर यांनी केली आहे.
यासंदर्भात अमित कोळेकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ. हर्षाली चौधरी-थवील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पालिकेच्या माध्यमातून महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना सुरू झाल्यास गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या योजनेद्वारे गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आर्थिक मदत मिळाल्यास अनेक रुग्णांना उपचार घेणे शक्य होईल, असेही कोळेकर यांनी महापौरांना सांगितले. यावर महापौरांनीही विषय सकारात्मकरीत्या विचारात घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, ही योजना सुरू झाल्यास कल्याण-डोंबिवली परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- March 13, 2026
कल्याण मध्ये गरजू रुग्णांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू करण्याची मागणी
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



