महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम महाराष्ट्र

‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच -सुजात आंबेडकर

 DESK MARATHI NEWS NETWORK.

औरंगाबाद/प्रतिनिधी – फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांशी Gen Z पिढीचा संवाद घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जय भीम Gen Z’ या टाऊनहॉल कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली.
यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “जोपर्यंत या देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही आरक्षण सोडणार नाही. काय करायचे ते करून घ्या.” Gen Z पिढी राजकीय होत असून स्वतःच्या न्याय आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरत आहे. या पिढीच्या राजकीय सहभागाचे स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर यांनी आरक्षणविरोधी आंदोलन, सोशल मीडिया पोस्ट आणि जातीय वक्तव्यांचा संदर्भ दिला. फुले-शाहू-आंबेडकरवादी तरुणांनी या परिस्थितीमुळे निराश होऊ नये, त्यांच्यासोबत आपण खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान विविध फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देशातील जातीय विषमता आणि आरक्षणाच्या गरजेबाबत भूमिका मांडण्यात आली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आधार घेत सामाजिक न्यायाच्या लढ्यात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात  शहराच्या नामांतराचा मुद्दाही उपस्थित झाला. एका तरुणाने ‘छत्रपती संभाजीनगर’ असे अधिकृत नामकरण झालेले असताना आपण आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते ‘औरंगाबाद’ असा उल्लेख का करतात, असा सवाल सुजात आंबेडकर यांना केला. त्यावर त्यांनी नामांतराच्या राजकारणावर भाष्य करत, पुणे शहराचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’ करण्याचा प्रस्ताव मांडला आणि असा बदल पुण्यातील ब्राह्मणवादी घटकांना मान्य होईल का, असा प्रतिप्रश्न केला.
यावेळी आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चारित्र्याबाबत करण्यात आलेल्या कथित बदनामीवरही सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले.
‘जय भीम Gen Z’ कार्यक्रमात अनेक तरुण-तरुणींनी सुजात आंबेडकर यांना विविध सामाजिक, राजकीय आणि आरक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले. त्यांनी या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. डिजिटल युगातील Gen Z पिढीचे प्रश्न, विचार आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेऊन त्यांना आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीशी जोडणे हा या टाऊनहॉलचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमामुळे मराठवाड्यातील युवा वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »