महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

सामाजिक बांधिलकी जपत राजू पाटील यांचे चाहत्यांना आवाहन,आपल्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स लावू नका,डिजिटल माध्यमातून शुभेच्छा द्या

DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी शहरभर फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स लावण्याची प्रथा पाहायला मिळते. मात्र, या जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होण्यासोबतच नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग्स लावू नयेत, असे आवाहन मनसे नेते राजू रतन पाटील यांनी केले आहे.

राजू पाटील यांचा वाढदिवस २६ सप्टेंबर रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक लावले जातात. मात्र, यंदा स्वतः राजू पाटील यांनीच समर्थक, मनसैनिक, स्नेही आणि मित्रपरिवाराला हे फलक न लावण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या जनतेच्या प्रेमावर आणि पाठिंब्यावर आपण उभे आहोत, त्याच जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा मनाला पटत नाहीत, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या; मात्र त्या डिजिटल माध्यमातून, फोन किंवा मेसेजद्वारे द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.
राजू पाटील यांना मानणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून, महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या या आवाहनाला समर्थकांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
शहर सुंदर, स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवण्यासाठी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स न लावता सहकार्य करावे, अशी अपेक्षा राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »