डोंबिवली/प्रतिनिधी– कल्याण – शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कल्याण – शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर 3 महत्वाचे जंक्शन्स आहेत. कुशाला हॉटेल, मानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेत? नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात. मात्र त्यांची कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा गौप्यस्फोटही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान या रस्त्याच्या कामाबाबत कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले की रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील.
- August 5, 2021
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण – शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



