DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण /प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लोढा समूहाने विकासकामांसाठी घेतल्या आहेत, अशा सुमारे ४५०० शेतकऱ्यांचा आरोग्य विमा लोढा फाऊंडेशनच्या वतीने काढण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी चार लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
माधव गोलवलकर गुरुजी अध्ययन केंद्र आणि आगरी यूथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने लोढा स्कूलच्या सभागृहात शनिवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना विमा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वझे, प्रल्हाद शास्त्री महाराज, अध्ययन केंद्राचे संचालक दिगंबर दळवी, प्राचार्य सुवर्णा कराडी, दत्ता वझे, भास्कर पाटील, रंगनाथ ठाकूर, जालिंदर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य विकासाचे पाच प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाची पहिली बॅच तयार झाली असून, या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा याच महिन्यात होणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगाराभिमुख व्हावे, असे आवाहन आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वझे यांनी केले.
याच कार्यक्रमात आगरी समाजातील ७५ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लोढा फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येकी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच आगरी यूथ फोरमच्या ४९ पदाधिकाऱ्यांचाही आरोग्य विमा काढण्यात आला असून, त्यांनाही हेल्थ इन्शुरन्स किटचे वाटप करण्यात आले.
कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी गुलाब वझे यांनी सांगितले. लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी आणि तरुणांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
- October 3, 2026
लोढा फाऊंडेशनकडून ४५०० शेतकऱ्यांचा आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स किटचे वाटप; ७५ गरजू विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



