कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसन दिवस वाढत आहे.त्याला रोखण्यासाठी केडीएमसीकडून कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवसांवर आलेल्या होळी आणि धुलीवंदन-रंगपंचमी साजरा करण्यास केडीएमसीकडून मनाई करण्यात आली आहे. येत्या २८ मार्च रोजी रविवारी होळी तर त्याच्या दुसऱ्या दिवशी २९ मार्च रोजी रंगपंचमी आहे.
मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी हे दोन्ही सण खासगी किंवा सार्वजनिक जागेमध्ये साजरे करण्यावर पालिका प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मी जबाबदार मोहिमेंतर्गत वैयक्तीकरित्याही शक्यतो हा उत्सव साजरा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा इशारा केडीएमसी प्रशासना कडून देण्यात आला आहे.
- March 25, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; होळी व रंगपंचमीवर केडीएमसीकडून निर्बंध
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



