DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सचिवपदी गणेश कारभारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. समाजकार्यात सातत्याने सक्रिय राहून नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी तत्परतेने धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून गणेश कारभारी यांची ओळख आहे.
नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास दिवस-रात्र न पाहता मदतीसाठी पुढे सरसावणारे गणेश कारभारी यांना जिल्हा सचिवपदाची जबाबदारी मिळणे ही त्यांच्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्याची पोहोचपावती असल्याची भावना कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीनंतर भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गणेश कारभारी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश कारभारी यांचे निकटवर्तीय मित्र महेश पडवळ यांनीही त्यांचा सत्कार केला. त्यांनी गणेश कारभारी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन जबाबदारीमुळे गणेश कारभारी यांच्यावर पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



