महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

अवघ्या एका तासात सातबाऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव? कल्याण तहसील कार्यालयातील प्रकाराने खळबळ

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/ प्रतिनिधी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरातील एका जमिनीच्या सातबाऱ्यावर अवघ्या एकातासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदविल्याचा आरोप करण्यात आल्याने कल्याण तहसीलकार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करूनदोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी आणि विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनीकेली आहे.

गौरीपाडा परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमिनीबाबत ऑगस्ट रोजी फेरफार करण्यातआल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. या फेरफार प्रक्रियेत शेतकऱ्यासोबत त्याच्या एका महिलानातेवाईकाचे नावही नोंदविण्यात आले आणि त्यानंतर सातबाऱ्यावर तिचे नाव समाविष्टकरण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या एका तासात झाल्याचादावा करण्यात येत आहे.

सामान्यतः फेरफार प्रक्रियेत संबंधितांना नोटीस देणे आणि हरकतींसाठी वेळ देणे अपेक्षितअसते. मात्र, या प्रकरणात कोणतीही पूर्वसूचना देता इतक्या वेगाने प्रक्रिया कशी पूर्ण झाली, असा सवाल प्रेमनाथ म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. तहसीलदारांच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचीमागणी केली आहे.

आमची सत्ता असताना माझ्यासोबतच असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्रीकपिल पाटील यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयातयाचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जमीन व्यवहारांमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेलकरणारी टोळी सक्रिय असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणालाआणखी गंभीर वळण मिळाले आहे.

कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती आपल्यालासध्या नसल्याचे सांगितले. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशीकरण्यात येईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आता या फेरफाराची प्रक्रिया नेमकी कोणत्या नियमांनुसार करण्यात आली, संबंधितांना नोटीसदेण्यात आली होती का आणि अवघ्या एका तासात सातबाऱ्यावर नाव नोंदविण्याची प्रक्रियाकशी पूर्ण झाली, याबाबतच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »