कल्याण प्रतिनिधी – तोक्ते चक्र वादळांमुळे शहरातील बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे, त्याच बरोबर काही दिवसात पावसाळा हि जवळ येत आहे. एकूण परिस्थिती पाहता घरांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री नागरीकांना खरेदी करता यावी यासाठी उद्या पासुन म्हणजेच २२ ते ३१ मे पर्येंत कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील इलेक्ट्रीक, हार्डवेअर तसेच ताडपत्री विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत कोरोना संदर्भातील अटीशर्तींना अधिन राहून उघडी ठेवण्यास पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी परवानगी दिली आहे. त्याच बरोबर शनिवार व रविवारी ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील याची नोंद व्यापाऱ्यांनी घायची आहे.
चक्री वादळामुळे शहरी आणि ग्रामिण भागातील बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे . नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करणे पावसाळ्या मुळे आवशक आहे पण घराची डागडुजी करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री कडक लॉकडाउन मुळे दुकाने बंद असल्याने नागरिकांना उपलद्ध होण्यासाठी पालिका क्षेत्रातील घराची दुरुस्ती डागडुजी करण्यासाठीचे सामान खरेदी करता यावे या साठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते .
उद्या पासुन सकाळी ७ ते ११ या वेळेत कोनोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचाही इशारा पालिके कडून देण्यात आला आहे . तरी सर्व व्यापारी व नागरिकांनी तंतोतंत नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- May 21, 2021
केडीएमसी क्षेत्रातील इलेक्ट्रीक, हार्डवेअर दुकाने ७ ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



