ठाणे/संघर्ष गांगुर्डे – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली असून त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले होते.आता मनसे आमदार यांच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून रेल्वेने 6 सप्टेंबर पासून कोकण वासीयांनासाठी रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत मनसे आमदार राजु पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या दिवारत्नागिरी पॅसेंजरला राजुदादा यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रवाश्यांना १६०० अल्पोपहाराचे पॅकेट्स व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश भोईर साहेब, हर्षद पाटील, संतोष पाटील विभाग अध्याक्ष तुषार पाटील व इतर सर्व दिवा विभाग पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना रेल्वेसेवेमुळे मोठा मिळाला दिलासा आहे।
- September 8, 2021
मनसे आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,कोकणासाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे सेवा सुरु
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



