DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील फायनल क्रमांक सहा यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातून सहभागी झालेल्या संघांनी अत्यंत चुरशीचे सामने खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर महिला गटात जबलपूर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेमुळे कल्याणमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी सांगितले की, अशा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते आणि भविष्यात अधिक खेळाडू घडण्यास मदत होते.कल्याण नगरीसाठी आपण तेवढी मोठी स्पर्धा आयोजीत करू शकलो ही फार अभिमानाची गोष्ट आहे असे ही ते म्हणाले त्याच प्रमाणे त्यांनी विश्वास दिला की यावर्षी पेक्षा पुढील वर्षी ही या पेक्षा मोठा प्रतिसाद मिळेल.



