महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

अनधिकृत चाळींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर,१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल,चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?काँग्रेसचा सवाल

DESK MARATHI NEWS NEWTWORK.

कल्याण/प्रतिनिधी  – कल्याण टिटवाळा परिसरातील शासनाच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणामागील भूमाफिया, चाळ माफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने जोरदारपणे लावून धरली आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संपूर्ण रॅकेटची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
टिटवाळ्यातील बनेली, वडवली, मोहणे, उभारणी आणि मांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या चाळींची जाहिरात करून सर्वसामान्य नागरिकांना ५ ते ६ लाख रुपयांत घर देण्याचे आमिष दाखवले जाते. अनेक कुटुंबे आयुष्याची कमाई खर्च करून ही घरे खरेदी करतात. मात्र काही काळानंतर महापालिका किंवा वन विभागाकडून या बांधकामांवर कारवाई केली जाते आणि त्यानंतर पुन्हा त्याच जागांवर नवीन अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या भागात सुमारे १००० अनधिकृत चाळी उभारण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या व्यवहारातून सुमारे ६००कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात विविध विभागांतील अधिकारी, स्थानिक राजकीय घटक आणि संबंधित यंत्रणांना आर्थिक लाभ मिळत असल्याचा आरोप करत काँग्रेसने निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून फक्त गरीब नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत. मात्र लोकांची फसवणूक करून कोट्यवधींचा व्यवसाय करणारे भूमाफिया, चाळ माफिया आणि संबंधित अधिकारी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसोबतच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली असून, या प्रकरणामुळे कल्याण टिटवाळा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »