महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

डोंबिवली
DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळावा, शेतीला नवसंजीवनी लाभावी आणि महाराष्ट्रात सुख-समृद्धी नांदावी, या मंगल संकल्पनेतून डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग, पूजाविधी आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री. रवींद्रजी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक विधीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहभागी होत राज्यातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली.

राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, पर्जन्यमान चांगले होऊन शिवारात समृद्धी नांदावी आणि बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, या भावनेतून यंदाच्या नवरात्रोत्सवात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले होते. वैदिक मंत्रोच्चार, पूजाविधी आणि होमहवनाच्या माध्यमातून राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, शेतकरी बांधवांना संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, असा मंगल संकल्प या महायागाच्या निमित्ताने करण्यात आला.

याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधिवत पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तसेच सप्तशती पाठवाचनासह विविध धार्मिक विधी पार पडले. प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवाची सुरुवात श्रद्धा, भक्ती आणि मंगलमय वातावरणात झाली. देवीच्या आराधनेतून समाजात सकारात्मकता, एकोपा आणि समृद्धी नांदावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »