महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम मुंबई

परराज्यांसाठी विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; वाढीव लोकलसाठी प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण /प्रतिनिधी – छठपूजेनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्राबाहेरील राज्यांसाठी तब्बल ४१८ विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र, दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या कसारा-कर्जत मार्गावर वाढीव लोकल सुरू करण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. परराज्यांसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देताना लोकल प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संघटनेने रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे. छठपूजेनिमित्त विशेष गाड्या सोडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, दररोज १० लाखांहून अधिक प्रवास करणाऱ्या कसारा-कर्जत विभागातील नियमित प्रवाशांच्या समस्यांकडेही रेल्वेने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.
एका बाजूला उत्सवाच्या काळात ४१८ विशेष गाड्या चालविण्यासाठी रेल्वेकडे इंजिन, डबे, कर्मचारी आणि मार्ग उपलब्ध होतात; मात्र दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी १० ते १२ वाढीव लोकल सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाची उदासीनता का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. ही भूमिका महाराष्ट्रातील नियमित लोकल प्रवाशांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप घनघाव यांनी केला.

१६ वर्षांत एकही वाढीव लोकल नाही
२०१० पासून कसारा आणि कर्जत मार्गावर एकही वाढीव लोकल सुरू करण्यात आलेली नाही, असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे. त्याचवेळी विशेष ट्रेनच्या नावाखाली गेल्या १६ वर्षांत १०० पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेस गाड्या वाढविण्यात आल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. दरवर्षी सण-उत्सवांच्या काळात विशेष गाड्या वाढवल्या जातात; मात्र नियमित लोकल सेवेत अपेक्षित वाढ होत नसल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

किमान १२ वाढीव लोकलची मागणी
कसारा आणि कर्जत विभागातील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होऊन सुमारे १० वर्षे झाली आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत प्रवाशांना गर्दीतून प्रवास करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सकाळच्या वेळेत कसारा ते सीएसएमटी आणि संध्याकाळी सीएसएमटी ते कसारा तसेच कर्जत मार्गावर किमान १२ वाढीव लोकल सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपर्यंत वाढीव लोकल सुरू केल्या नाहीत, तर १ डिसेंबर रोजी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »