महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

उल्हासनगरात 75 तर गोरेगांव येथे 319 निरंकारी भक्तांचे रक्तदान,उल्हासनगर येथे 75 तर गोरेगांव येथे 319 निरंकारी भक्तांचे रक्तदान

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/ प्रतिनिधी – सद्गुरू  माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको” या बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषाला कृतीत उतरवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगर प्रदेशात उल्हासनगर आणि गोरेगाव येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये एकंदर 394 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवणूक जीवनात उतरवत मानवीयतेचा आदर्श समोर ठेवत संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 75 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 42 पुरुष तर 33 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. रेडक्रॉस सोसायटी मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या उल्हासनगर तसेच आजुबाजूच्या शाखांमधील निरंकारी भक्तगणांनी रक्तदान केले.

मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक किशन नेनवाणी आणि सेवादल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निरंकार ईश्वराच्या प्रति प्रार्थना करत सतगुरुंच्या जयघोषा द्वारे या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. मिशनच्या डोंबिवली झोनचे झोनल इंचार्ज रावसाहेब हसबे यांच्यासह सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे या शिबिराला आवर्जून उपस्थित होते.

शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्यांमध्ये आमदार सुलभा गायकवाड, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक भुल्लर महाराज व जमनादास परसवानी, माजी आमदार सुरेश कलानी, झुलेलाल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त लीलाराम मूलचंदानी, ज्येष्ठ पत्रकार ताराचंद जमनानी आदिंचा समावेश होता. या मान्यवरांनी निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी सत्संग भवन, संत निरंकारी उद्यान, वासरी हिल, गोरेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये गोरेगांव, मालाड, वासरी हिल, संतोष नगर, गोविंद नगर, बिंबिसार नगर तसेच मालवणी आदि परिसरातील 319 निरंकारी भक्तगणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने 228 युनिट तर नायर हॉस्पिटलच्या रक्तपेढीने 91 युनिट रक्त संकलित केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »