महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याण पूर्वेतून कोकण, सातारा, कोल्हापूरकडे मोफत बस सेवा,श्री तिसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत बससेवेचे आयोजन

DESK MARTAHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातर्फे तसेच श्री तिसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड येथून कोकण, सातारा, कोल्हापूर यांसह विविध गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या गावाशी नाळ जोडणारा सण मानला जातो. मुंबई आणि उपनगरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे अनेक चाकरमानी गणरायाच्या आगमनासाठी दरवर्षी आपल्या मूळ गावी जातात. मात्र, सणाच्या काळात वाढणारी प्रवाशांची संख्या, गर्दी आणि वाढलेले प्रवासाचे दर लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी या मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले.
आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या प्रयत्नातून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात चाकरमान्यांसाठी ही सेवाभावी परंपरा सुरू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आपल्या माणसांना गणेशोत्सवासाठी सुखरूपपणे त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बस चालक आणि वाहकांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच गावी जाणाऱ्या सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक प्रवास सुखरूप व्हावा आणि प्रत्येक कुटुंबात आनंद, समाधान व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
या उपक्रमाला युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गणपत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे, सुभाष म्हस्के, नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड, सरोज राय, इंदिरा तरे, मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, संतोष शेलार, अमित गायकवाड, सुनील आमने, संदीप तांबे, लल्लन कनोजिया, मयुरेश तरे, गुड्डू खान, अमोल साळुंके, अनिल म्हात्रे, चेतन म्हात्रे, सविता देशमुख, वंदना मोरे, रेश्मा शिरकर, जयश्री सानप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कोकणवासीय प्रवासी उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या सुखकर प्रवासाची व्यवस्था हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा ठरली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »