नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लिग २.० अभियानानुसार डोंबिवली येथील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीड़ा संकुलात कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत तसेच शालेय व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागात संपन्न झाले.या समयी स्वच्छते विषयक जनजागृती करण्यासाठी सर्व उपस्थितांमार्फत स्वच्छता शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन स्वच्छतेविषयक घोषवाक्यांचे सादरीकरण केले.
या स्वच्छता अभियानात कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, हेमा मुंबरकर, डोंबिवली विभागाचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे तसेच महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर रुपाली शाईवाले, विवेकानंद सेवा मंडळाचे अनिल मोकल, ऊर्जा फाऊंडेशनच्या सायली महाजन तसेच टिळकनगर शाळेचे NCC Cadets, मॉडल कॉलेज, मंजुनाथ कॉलेज, प्रगती कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



