महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात घुसून कनिष्ठ अभियंत्याला जबर मारहाण व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाणीसह भादंविच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली.

भानुदास दशरथ घरत आणि रोहित राम घरत अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे आणि कर्मचारी खडवली शाखा कार्यालयात काम करत असतांना शनिवारी २ सप्टेंबर रोजी दोघे कार्यालयात आले. नवीन वीजजोडणी का देत नाही, अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. मारहाण करणाऱ्या इसमांच्या कुटुंबियांच्या नावाने गावातील किराणा दुकान आणि कृषिपंप वीजजोडण्यांची थकबाकी असल्याने नवीन कनेक्शन देता येत नसल्याची माहिती अभियंता म्हात्रे यांनी दिली. यावर आरोपींनी अभियंता म्हात्रे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कार्यालयातील खुर्चीची मोडतोड केली. अभियंता म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ४२७, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »