नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – डॉ_श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना शहर शाखा, डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्व येथील के. बि. वीरा महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान हा ग्रंथोत्सव सुरु राहणार असून मराठीतील ४० हून अधिक नामवंत प्रकाशकांची हजारो पुस्तके सवलतीच्या दरात मिळणार असून यामध्ये मुलांसाठी धम्माल विनोदी गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, आरोग्य, अध्यात्म आदी अनेक विषयांच्या पुस्तकांसह इंग्रजी पुस्तकांचा देखील सामावेश आहे.

या ग्रथोत्सवामध्ये खासदार श्रीकांत शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथानी त्यांची तुला करण्याचा मानस त्यांनी नम्रपणे नाकारत ग्रथांनीच ग्रंथांची तुला करण्याचे त्यांनी सांगितले. या ग्रंथ तुला मधील सर्व पुस्तके शाळेला भेट म्हणून दिली. साहित्य रसिकांची वाचनाची भूक भागविण्याबरोबरच लहान मुलांमध्ये देखील वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांना वाचनाचे महत्व कळावे हा हेतु या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून सफल होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करत जास्तीत जास्त नागरिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना केले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मा. महापौर विनिता राणे, मा. नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपक भोसले, कविता गावंड, वैशाली दरेकर, किशोर मनकामे, सागर दुबे, सागर जेधे, प्रकाश तेलगोटे तासेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.



