DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -शीळफाटा कल्याण फाटा जंक्शन परिसरातील जीवघेण्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शीळफाटा जंक्शन येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शीळफाटा परिसरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
“आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आणि वेळेच्या बचतीसाठी एकत्र या,” असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. या जनआंदोलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे.
शीळफाटा हा कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका दररोज हजारो वाहनचालकांना बसतो. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडून वाहतूक नियोजन आणि रस्त्याशी संबंधित उपाययोजनांबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी केली जाणार आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शीळफाटा (कल्याण फाटा) जंक्शन येथे होणाऱ्या या जनआंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
- October 3, 2026
शीळफाट्यावरील वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे ११ ऑक्टोबरला जनआंदोलन
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



