महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणात विएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन; विद्यार्थ्यांना फी परत करण्याची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात ब्युटी पार्लर आणि सलून प्रशिक्षण देणाऱ्या व्हीएलसीसी संस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. प्रशिक्षणासाठी पूर्ण फी भरूनही वेळेत आणि योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन महिन्यांचा कोर्स पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ ते नऊ महिने लागत आहेत. तसेच ११ दिवसांचा प्रशिक्षण कोर्स सुरू करून तीन महिने उलटूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. संस्थेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानासोबतच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
या प्रकाराची तक्रार प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्हीएलसीसीच्या कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात आली असल्याने प्रशिक्षण देणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत व्हीएलसीसीच्या समन्वयक पालकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
मात्र, विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे आता विद्यार्थ्यांसह मनसे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »