महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

कल्याणात फेरीवाला कारवाईविरोधात उपोषण,दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले. महापालिकेने फेरीवाला धोरण तातडीने राबवावे आणि पथविक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
डोंबिवली फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर आणि भारत पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते, मच्छी विक्रेते, हातगाडी चालक यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई करताना फेरीवाला कायद्यातील नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
गेल्या बारा वर्षांत महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले नाही, अधिकृत परवाने दिले नाहीत. उलट हप्ते घेऊन गरीब फेरीवाल्यांना देशोधडीला लावले जात आहे. दीडशे मीटर नियमाच्या नावाखाली संपूर्ण शहरात कारवाई केली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
तसेच मोठ्या ऑनलाईन विक्री कंपन्यांकडून हप्ता घेत लहान फेरीवाल्यांवर अन्याय केला जात असल्याचाही आरोप संघटनेकडून करण्यात आला.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि फेरीवाल्यांना न्याय मिळाला नाही, तर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल,असा इशारा भाऊ पाटील यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »