DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक नवजात बालकाचा कल्याण पश्चिमेत वसंत व्हॅली प्रसूतीगृहात मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली होती. त्या बालकांच्या पालकांनी NICU सुसज्ज नसल्या मुळे आमच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाला जबाबदार धरले होते. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालत प्रसूतीगृहात सुसज्ज एनआयसीयू सुरू करण्यासाठी कल्याण ग्रामीण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख अमित कोळेकर यांनी सतत पाठपुरावा केला आणि अमित कोळेकर यांच्या पाठपुराव्याना यश आले आहे.
त्यांना पालिकेच्या आरोग्य विभाकडून एक पत्र प्राप्त होऊन त्यात प्रसूतीगृहात नवजात अतिदक्षता विभाग सुरू करणीसाठी निविदा काढल्याचे म्हंटले आहे. शहरातील मातांना व नवजात बाळांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वसंत व्हॅली, कल्याण पश्चिम येथील प्रसूतीगृहात नवजात अतिदक्षता विभाग (NICU) लवकरच सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.
शिवसेनेचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित संभाजी कोळेकर यांच्या मागणीच्या अनुषंगाने पालिकेकडून या बाबतची कार्यवाही करण्यात आली आहे. कोळेकर यांनी दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या पत्राच्या संदर्भात पालिकेकडून अधिकृत प्रतिसाद देण्यात आला आहे.पालिकेने वसंत व्हॅली प्रसूतीगृह बाह्यसंस्थेमार्फत १० वर्षांसाठी चालविण्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया सुरू केली असून, त्यामध्ये ५० जनरल बेड, ५ अतिदक्षता विभाग (ICU) बेड आणि १० बेडचा नवजात अतिदक्षता विभाग (NICU) समाविष्ट करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने कळवले की, संबंधित ठिकाणी लवकरच सुसज्ज ‘NICU’ विभाग सुरू करण्यात येईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि नवजात शिशूंच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित संभाजी कोळेकर यांनी सांगितले आहे की कल्याणच्या पालिका रुग्णालयात एनआयसीयूची सुविधा उपलब्ध नाही त्याच बरोबर गरीब गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयातील एनआयसीयूचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यातच आमच्या पाठपुराव्याला यश येऊन पालिका प्रसूतिगृहात जर एनआयसीयू सुरू होऊन गरीब गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्याच बरोबर त्यांनी पालिका प्रशासनाला एनआयसीयू लवकरात लवकर रुग्णाच्या सेवेत दाखल करण्याची विनंती केली आहे.



