नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/ प्रतिनिधी – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील आपचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या अटकेच्या निषेधार्थ कल्याण मध्येही आप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते हे उपस्थित होते व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी खूप चांगली कामे केली आहेत आणि ही चांगली काम भाजपला खपलेली नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामाचा भारतीय जनता पक्षाला फटका बसणार आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याचे मत देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.