नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – घरात एकटे असताना अनोळखी लोकांसाठी दार उघडून संवाद करणे धोक्याचे झाले आहे. घरात असलेले मौल्यवान वस्तू लंपास करण्यासाठी हे टोळके संवाद करत असल्याचे नुकतेच संभाजीनगर येथील घटनेने दाखवून दिले आहे. भांडी चकाकून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी वृद्ध महिलेशी झटापट करत एक लाख रुपये किमतीची तब्बल अडीच तोळ्याची सोन्याची चैन चोरल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे.
हे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली असता वृद्ध महिलेच्या घरी दोन जण गेले त्यांनी आम्ही पितळाच्या तांब्याच्या भांड्यांना उजाळा देतो आम्ही उजाला कंपनीकडून सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या कंपनीची पावडरची जाहिरात सुरू असून आम्ही पितळी भांडे व सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून चमकवून देतो, असे म्हणत थेट घरात घुसले. भामट्यांनी वाटीत पाणी घेऊन त्यात हळदीची पूड लाल रंगाचा द्रव टाकत ते गॅसवर गरम करण्यासाठी वृद्ध महिलेला सांगितले. गरम पाण्यात चैन टाकून बाहेर काढताच चैन ब्रशने चमकून दिल्या. दोघांनी वृद्धेला तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन द्या चमकून देतो असे म्हणत चैन घेऊन पोबारा केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले.