महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याण दुर्गाडी पुलावर ट्रक चालकाची हत्या,फरार आरोपी आठरा तासात जेरबंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण / प्रतिनिधी – पहाटे ट्रक बंद पडल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा होता. इतक्यात मागून दुचाकी स्वार येवून त्या ट्रकवर आदळले. या घटनेनंतर दुचाकी स्वारांनी ट्रक चालकाशी हुज्जत घातली. व ट्रक चालकाची या दुचाकी स्वारांनी निर्घुण हत्या केली. सदर घटना कल्याण येथील कोन गाव परिसरात घडल्याने कल्याण बाजारपेठ पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरु केला.

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून अटक केली आहे. हत्येनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आहे. धक्कादायक म्हणजे तुझ्या ट्रकमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे म्हणून आम्हाला पैसे दें असा बहाणा करुन दोघे ट्रक चालकाकडून जबरदस्तीने पैसे मागत होते. ट्रक चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांची हत्या केल्याची उघडकीस आले आहे.

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात एक ट्रक चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. गाडीच्या एका चालकाचा बोल्ट खाली पडल्याने त्याने कोन गाव ब्रीजवर गाडी उभी केली. बंद पडलेली गाडी चेक करीत असताना मागून एका दुचाकीने त्या ट्रकला धडक दिली व त्यानंतर दुचाकी वरती स्वार असलेल्या दोघा आरोपींनी ट्रक चालकाशी अरेरावी करत बोलायला सुरुवात केली. तू ट्रक थांबविल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले. आमच्या गाडीची नुकसान भरपाई दे असे सांगत भांडण सुरू केले. ट्रक चालककाने माझ्या गाडीमुळे नुकसान झालेले नाही. त्यामुळे मी काही पैसे देणार नाही असे सांगितल्याचा राग या दोघांना आल्याने या दोघांनी मिळून धारदार शस्त्राने ट्रक चालकावर वार केले. यात ट्रक चालक याचा जागेवर मृत्यू झाला.

कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपीना शोधण्यासाठी काही तपास पथके नेमली गेली. अखेर १८ तासांच्या आत दोन्ही आरोपींना वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाची हत्या करुन दोघेही अजमेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यातील एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे चौकशीअंती समजले आहे. तरी पुढील तपास सुरु आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »