नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – सणांच्या उत्साहात सगळीकडे धावपळ सुरु असताना बाजारपेठ लोकांनी फुलली आहे. खरेदी साठी दूर गावातून आलेले वाहक आपल्या दुचाकी वाहनांना बाजारपेठेत वाहन तळावर उभे करत खरेदीत मग्न असतात.अशातच वाहन तळावर चोर दबा भरून असतात आणि संधी मिळताच मोटार सायकलची चोरी करतात. अशी घटना भुसावळ परिसरात घडत आहे.
भुसावळ बाजारपेठ आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलीसांना यश आले आहे. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली आहे.



