नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली आहे. आमदार मुंदडा यांनी मराठा आरक्षणासह इतर सर्व मागण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लेखी पत्र देऊन आपला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
कळसंबर ग्रामस्थांच्या वतीने हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत आमदार नमिता मुंदडा आपला पाठिंबा देणार नाहीत तोपर्यंत मराठा समाजाची हीच भूमिका असणार असं आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर मुंदडा यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Related Posts



