महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात मीटरची हंडी फोडून वंचितने केले अनोखे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचा अदानी इलेक्ट्रिसिटी पॉवरकडून दरवाढ आणि वाढीव वीजबिले पाठवून केल्या जाणाऱ्या आर्थिक लुटीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केले. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात उपनगरातील जनतेची लूट थांबवावी, अदानी ऐवजी बेस्ट ची सेवा उपलब्ध करावी आणि वाढीव बिले ५०% माफ करावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

यावेळी आंदोलनाला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “अदानीच्या वीज मीटरमध्ये दोष आहे, तर याचे नुकसान जनतेनी का भरावे? आधी वीज मीटर सरकार स्वतः सगळी प्रक्रिया करून घरी मिटर फिट करून देत होते पण, आता अदानी इलेक्ट्रिसिटी आल्यापासून लोकांना ना हरकत प्रमाणपत्र स्वतः आणून स्वतः मीटरसाठी अदानी पॉवर कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. आम्ही तुमचे गुलाम नाहीत. अदानीकडून मीटर काढून बेस्टकडे परत इलेक्ट्रिसिटी मीटर देण्यात यावे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन, महासचिव आनंद जाधव, वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष प्रविण रणशुर, मुंबई प्रदेश मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष दौलत खान, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा सुनिताताई गायकवाड, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “बेस्ट असताना शंभर युनिट्सकरिता जेव्हढे बिल यायचे आता अदानीमार्फत त्याच्या दुप्पट बिल येतं. आरे कॉलनीमध्ये मिटर लावण्यासाठी सीईओकडे ना हरकत प्रमाणपत्र करिता जावे लागते. यांच्या बेशिस्त वागण्यामुळे आरे कॉलनीतील ६० टक्के लोकांच्या घरी अद्याप मीटर नाही. अदानी पावरने  लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील सिद्धार्थ नगर भागात जवळपास 5 हजार गरीब लोकांचे कनेक्शन बंद केले होते. 2018 मध्ये अदानीचे मीटर जास्त बिल देत होते यांचे मीटर गंडले तर सामान्य लोकांनी जास्त पैसे का द्यायचे ? अदानी कंपनी सांगते तापमान वाढले म्हणून बिल वाढते. तुम्ही आमच्या घरी स्मार्ट मीटर लावले का थर्मामीटर लावले? याचं उत्तर त्यांनी द्यावे.

अदानी पावरच्या काळात लोकांचे वीज बिलाच्या तक्रारीत दुप्पट वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी- अमित शहा देश विकायला निघाले आहेत, आपल्याला देश विकण्यापासून थांबवायचा आहे. नरेंद्र मोदी पब्लिक सेक्टर अदानीच्या घशात घालताय. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणातात की, मोदी हा देश दारुड्या सारखा विकायला लागलेय. राहुल गांधी संसदेत अदानी आणि मोदींचा फोटो दाखवतात पण, त्यांचे मित्र असलेले शरद पवार यांचा अदानी सोबतचा सिल्वर ओक, गच्चीवरचा फोटो का दाखवत नाही ? आमची प्रमुख मागणी आहे की, जे वाढीव बिलं दिलेले आहेत ते त्यामध्ये जनतेला ५० % सूट द्यावी !वंचित बहुजन आघाडी जेव्हा मुंबई महापालिकेत जाईल, तेव्हा अदानीच्या ह्या कारभाराला उचलून आम्ही मुंबईच्या बाहेर फेकून देऊ! आम्ही महापालिकेत सत्तेवर आलो तर जनतेला १०० युनिट पर्यंतच वीज बिलं मोफत करू अदानींनी जे वाढीव बिलं दिले आहेत त्यांना आम्ही फाडून निषेध करतो!”

यावेळी अदानी मीटर ची प्रतीकात्मक दहीहंडी थर लावून फोडण्यात आली. मोठ्या संख्येने मुंबईकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »