नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही आपल्या देशाची शान आहे. ही शान तेवत ठेवण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करीत असते. बृहन्मुंबई महानगरपालिका हा मुंबईचा श्वास आहे. मुंबईची शक्ती आहे. मुंबईवर कोणतेही संकट आले तर न डगमगता प्रत्येक संकटाला बृहन्मुंबई महानगरपालिका सामोरे जात असते. ४ सप्टेंबर हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा स्थापना दिवस बृहन्मुंबई मनपाच्या स्थापनेला ४ सप्टेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली आहेत.त्या स्थापना दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या विविध विभागात निरनिराळ्या पद्धतीने हा स्थापना दिन साजरा करण्यात आला. महानगर पालिकेचे सर्वच विभाग अति महत्वाचे आहेत. त्यात भायखला येथे असलेले व मस्जिद येथे असलेले महानगरपालिकेचे मुद्रणालय हेही पालिकेचे महत्वाचे भाग म्हणून गणले जातात. या मुद्रणालयातही महापालिकेचा स्थापना दिन मोठ्या आत्मीयतेने साजरा करण्यात आला.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्राप्त झालेल्या परिपत्रकाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका मुद्रणालयाच्यावतीने स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यात डेंग्यू, मलेरीया, कावीळ अशा विविध आजारांवर उपाययोजना करण्याबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रके महानगरपालिका मुद्रणालयात ठिकठिकाणी लावण्यात आली, त्याच प्रमाणे मुद्रणालयाच्या आवारात काढलेल्या रांगोळीच्या विविध रंगानी स्थापना दिनाचा आनंद द्विगुणित केला.
त्याच प्रमाणे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुद्रणालयाच्या आवारात ठीक ठिकाणी विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. मनिषा सुरज नगरे या महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सहाय्यक वैदयकीय अधिकारी म्हणून 10 वर्षापासून आरोग्य सेवा देण्याचे अविरत कार्य करत आहेत. त्यांनी महिला व बालसंगोपन तसेच पावसाळयात होणाऱ्या आजारांचे निर्मुलन कसे करायचे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर यांनी आपले मनोगत मांडले,व महापालिकेची महती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक्षक अर्चना गांगुर्डे यांनी केले. त्याच प्रमाणे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या कर्मचारी कामगार अधिकाऱ्यानी सहकार्य केले त्यांचे यावेळी त्यांनी मुद्रणालया कडून आभार मानले.
यावेळी उप व्यवस्थापक स्वप्ना घुले यांच्यासह मुद्रणालयाचे सह. व्यवस्थापक नंदकुमार कोटकर, गिरीश रानडे,सोमनाथ जाधव योगेश साळुंखे व दुय्यम अभियंता अमोल अहिरे लखुलेखक धीरज शेलार उपस्थित होते.त्याच प्रमाणे मुद्रणालयाच्या सर्व विभागातील कर्मचारी,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते,



