नेशन न्यूज मराठी टिम.
जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला, पुरुष, युवक अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला.या मेळाव्याला जिल्हाभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार यांचा मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सत्कार केला.
शेतकऱ्यांचा आसूड हा सरकारवर उगववा, हे डोळ्यासमोर ठेवून आमदार रोहित पवार यांना आसूड देण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बैलगाडी देवून यावेळी आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
आता तर टिव्हीवर भाजप नेत्याच भाषण सुरू असेल तर कुणी पाहत नाही, त्यापेक्षा साऊथ इंडियन पिक्चर सर्व जण पाहतात, लोक भाजप नेत्याच्या भाषाणापेक्षा मनोरंजनासाठी साऊथ इंडियन पिक्चर पाहणं पसंत करतात अशी सडकून टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावातील अमळनेर येथील मेळाव्यात केली आहे.
जळगाव जिल्ह्यात जसं बोगस खते आणि बोगस बियाणे निघाले त्याच पद्धतीने आपले सरकार सुद्धा बोगस आहे.या सरकारला शेतकरी, युवा महिला , रोजगार यांच्याबद्दल काहीही घेणे देणे नाही
शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर टीव्ही वर बातमी यावी म्हणून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गोष्टीमध्ये टिव्ही वर येण्यासाठी आमदार अनिल पाटील यांची मोठी धडपड असते.
विरोधात असताना मंत्री अनिल पाटील यांनी विधानभवनात कापासासाठी आंदोलन केलं. आता सत्तेसाठी सर्व सामान्य लोकांचे प्रश्न हे विसरले अशा या नेत्याने मंत्री झाल्यावर ज्या भूमीचे दर्शन घेतले, त्याच भूमीतील नागरिक, लोक, मतदार हे मंत्री अनिल पाटील यांना 2024 मध्ये त्यांची जागा दाखवेल.



