नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – मुखेड ते खाणापुर फाटा या रस्त्याचे काम इ.स 2019 पासून ते आजपर्यंत शेतकऱ्याच्या जमिनीचे भूसंपादन न केल्यामुळे बंद आहे. सदरील रस्त्यात जाणारी जमीन ही अल्पभूधारक व अतिअल्पभूधारक तर काही आदिवासी बांधवांची आहे. सदर जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया न करता सर्व रस्त्यांची खोदकाम करून ठेवण्यात आले आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन ही देण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले की, मी स्वतः यामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावेल, परंतु अद्यापही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. येत्या 15 दिवसांत रखडलेले काम मार्गी नाही लागले तर आम्ही सर्व शेतकरी कार्यालयीन परिसरात कोणतीही पुर्वसूचना न देता आत्मदहन करू असा इशारा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिला आहे.



