नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – सावधान राहण्याची वेळ अमरावतीकरांना आली आहे. कारण अमरावती जिल्ह्याच्या धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरामध्ये बनावट पोलीस फिरत होते. नुकताच पोलिसांनी केलेल्या कारवाईतून संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील धारणी येथे तोतया पोलिसांनी पोलीस असल्याचा बनाव करून एकाला लुटले आहे. त्याची गाडी घेऊन फरार झालेत.
पोलिसांनी चक्र फिरविली आणि तोतया पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास सध्या पोलिस करत आहेत.



